पैठणी : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव

अंजली देशमुख 

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी,
गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी,
नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती,
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.
साडी ही भारतीय स्त्रीची ओळख आहे. महाराष्ट्रातील साडीला लुगडी, चिरडी, पातळ, पितांबर, शालू आणि पैठणी अशी वेगवेगळी नावे आहेत. यात सर्वप्रथम मान मिळतो तो पैठणीला. या महावस्त्राच्या इतिहासाला 2000 वर्षांची पंरपरा आहे.

 

मायलेकीच्या आत्महत्येचे गूढ उकलले

तीन लाखांपर्यंत किमती
पैठण ही पुरातन काळी महाराष्ट्राची राजधानी होती. या पैठणीमध्ये तयार होणारी वैशिष्ट्यपूर्ण शिवकालीन साडी म्हणजे पैठणी. पदरावर मोराच्या नक्षी ही या साडीची खासियत हातमागावरील पैठणीला किंमत ही जास्त असते. पैठणी साडीची किंमत अडीच हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यंत असते.

 

बंडखोरांच्या बॅनर, पोस्टवरून उद्धव ठाकरे गायब !
हे आहेत प्रकार
पैठणीमध्ये ब्रोकेड पैठणी, बांधणी पैठणी इतकेच काय तर कलमकारी आणि बनारसी पैठणी असे प्रकारही पाहायला मिळतात. महाराणी पैठणी हे साउथमधून येते तसेच बनारसी पैठणी ही बनारसहून येते. कलमकारी आणि बनारस पैठणी याच्या अंगावर कलमकारी प्रिंट तसेच बनारसी प्रिंट असते आणि बॉर्डर ही पैठणीचे असते. मध्यंतरी डॉलर प्रिंट असलेली पैठणी महिलावर्गात पसंतीस उतरली.काळानुसार तिच्या रूपात, शैलीत, वीणकामाच्या पद्धतीत बदल होत गेले पण पैठणी मात्र तशीच राहिली.
-अंजली देशमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *