संशयित वृद्ध महिला सीसीटीव्हीमध्ये कैद
येवला ः प्रतिनिधी
शहरातील बुरुड गल्ली येथील सुरेखा पैठणी शोरूममधून साड्या खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन वयोवृद्ध महिलांनी पैठणी साड्यांची चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे.
येवला शहरातील पैठणी शोरूममध्ये पैठणी साड्यांची चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली. पैठणी व्यापारीवर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. येवला शहरात सुरेखा पैठणी शोरूममध्ये साड्या खरेदी करण्यासाठी ग्राहक म्हणून आलेल्या दोन वृद्ध महिलांनी संबंधित पैठणी शोरूम दुकानदाराला बोलण्यात व्यस्त ठेवून तब्बल दीड लाख रुपयांच्या महागड्या सहा ते सात पैठण्या हातोहात लंपास केल्या. या चोरी प्रकरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे असून,
या महिलांनी सदर पैठणी साड्यांची मोठ्या चलाखीने चोरी करून पाबोरा केला. दरम्यान, चोरट्या महिलांंनी चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातून सदर चोरी उघड झाली. या चोरीमुळे दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पोलिसांनी संशयित महिलांचा शोध घ्यावा, अशी मागणी संबंधित शोरूम मालकाने केली आहे.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…