पंचवटी : वार्ताहर
पंचवटी परिसरातील अंबिका झोपडपट्टीजवळ देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणार्या रेकॉर्डवरील संशयितास पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पंचवटी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करत आहेत.
शनिवार (दि.7) पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संपत जाधव, सपोउनि संपत जाधव, हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलिस नाईक, लोणारे, पोलिस शिपाई कुणाल पचलोरे, अंकुश अरुण काळे पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस शिपाई अंकुश काळे यांना मिळालेल्या माहितीवरून पंचवटी पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील संशयित सौरभ ऊर्फ सॅमसंग जयप्रकाश पोतदार याच्याकडे गावटी कट्टा आहे. तो अंबिका झोपडपट्टीजवळ, पेठ रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.7)ी सायंकाळी 6:55 वाजता सापळा रचून संशयित सौरभ ऊर्फ सॅमसंग जयप्रकाश पोतदार (वय 20, रा. मुदकेश्वर वसाहत, काझीगढी, जुने नाशिक) याला अंबिका झोपडपट्टीजवळ, पेठ रोड, पंचवटी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून 30 हजार रुपयांचे एक स्टिल धातूचे देशी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा), एक रिकामी मॅग्झीन मिळाली. तेे जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
यांनी केली कामगिरी
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परिमंडळ किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा बढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार महेश नांदुर्डीकर, पोलिस नाईक लोणारे, पोलिस शिपाई कुणाल पचलोरे, अंकुश काळे, हवालदार कैलास शिंदे, मालसाने, काळे, पोलिस नाईक जयवंत लोणारे, पोलिस अंमलदार परदेशी, गायकवाड, पोलिस शिपाई वायंकडे, चितळकर, महिला पोलिस शिपाई शिंदे यांनी कामगिरी पार पाडली आहे.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…