नाशिक

नाशिकमधून पेपरफुटी; ‘नीट’ परीक्षा रद्द

‘सीबीआय’कडे तपास; नव्याने परीक्षा होणार

नवी दिल्ली/मुंबई । प्रतिनिधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने 3 मे 2026 रोजी देशभरात घेतलेली ’नीट-यूजी’ वैद्यकीय प्रवेश परीक्षा अखेर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेच्या पेपरफुटीबाबत सुरू असलेल्या वादाच्या पाश्वर्र्भूमीवर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे ’एनटीए’ने स्पष्ट केले आहे.

तपासातून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, परीक्षेच्या सुमारे 15 दिवस ते एक महिना आधीच एक ’गेस पेपर’ सोशल मीडिया आणि टेलिग्राम चॅनलवर फिरत होता. या प्रश्नपत्रिकेतील जवळपास 120 हून अधिक प्रश्न (मुख्यतः रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांचे) प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचे आढळले आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी)ने जयपूर आणि सीकरमधून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जयपूरमधील मनीष नावाच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे.
धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत
या पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती आणि तिथून ती हरियानामार्गे इतर राज्यांत पोहोचली. याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर भागातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. राजस्थान पोलीस अधिक तपास करत आहेत. नाशिकमधून तयार झालेली ही प्रत नंतर बिहार, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्येही प्रसारित झाल्याचा संशय व्यक्त केला
जात आहे.

लातूरमधील नामांकित अकॅडमी संशयाच्या गर्तेत
नाशिकसोबतच राज्याचे शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरमधील एका कोचिंग अकॅडमीचे नावही या वादात समोर आले आहे. लातूरमधील एका नामांकित अकॅडमीने सोशल मीडियावर प्रसारित केलेले काही व्हिडिओ आणि ’टेस्ट सिरीज’चे पेपर प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसारखेच असल्याचे निदर्शनास आले आहे. लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अद्याप कोणताही औपचारिक गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगितले असले तरी, संबंधित अकॅडमीची आणि तिथल्या संशयास्पद हालचालींची चौकशी यंत्रणांकडून केली जात आहे.

ठळक महत्त्वाचे ठळक मुद्दे
♦  परीक्षा रद्द: लवकरच फेरपरीक्षा होणार.
♦  सीलबंद तपास: तपास सीबीआयकडे वर्ग, केंद्राचा मोठा निर्णय.
♦  नाशिक कनेक्शन: प्रश्नपत्रिकेची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार
♦  लातूर रडारवर: लातूरमधील अकॅडमीची चौकशी सुरू.
♦  मोठं रॅकेट: राजस्थान, हरियाणा, बिहार आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पेपरफुटीचे जाळे पसरल्याचा अंदाज.

विद्यार्थ्यांना दिलासा- फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा कोणतेही नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने असे आश्वासन दिले आहे की, पारदर्शकता राखण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी नीट-एनटीए या संकेतस्थळाला भेट द्यावी.

देशभरातूत 16 ताब्यात
या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेचे चार सदस्यीय पथक मंगळवारी नाशिकात दाखल झाले असून, त्यांनी संशयिताची चौकशी करून पुढील तपासासाठी त्याचा ताबा घेतला. पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेल्या नीट परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे पूर्वीचीच राहणार असून, नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून परीक्षार्थींना नवे प्रवेशपत्र देण्यात येणार आहे.

 

 

Paper leak from Nashik; ‘NEET’ exam cancelled

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago