ठाण्यातील एजन्सी संचालकावर गुन्हा
सिडको : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तांच्या नावाने बनावट प्रशासकीय आदेश तयार करून कोट्यवधी रुपयांच्या मंजुरीचे दस्तऐवज बनवल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे येथील एआय ऑटोमेशन सोल्यूशन्स एजन्सीचा संचालक व संस्थापक अभिषेक संजय झरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभमेळा आयुक्त कार्यालयाचे लेटरहेड, ई-ऑफिस क्रमांक, मुद्रा आणि डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून आरोपीने दोन बनावट प्रशासकीय आदेश तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामध्ये 300 ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून देण्यासाठी आणि तीन महिन्यांच्या खर्चास दोन कोटी 23 लाख रुपयांची मंजुरी दर्शविणारा आदेश, तसेच त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय हस्तांतरण, तीन वर्षांच्या भाडेकरारासह इतर सुधारणांसाठी एक कोटी 72 रुपयांच्या मंजुरीचा आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.
जुने जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयात ही बाब उघडकीस आली. आरोपीकडील मोबाइल उपकरणातील दस्तऐवज आणि मूळ आदेशांची पडताळणी केल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तुषार आढाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि उपनिरीक्षक ललित केदारे करीत आहेत.
Fake orders in the name of Kumbh Mela Authority
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…