पली मुले दहावी व बारावीला गेल्यावर बहुतांश पालकांच्या मनातील अपेक्षा जाग्या होतात. त्यांची मुलांबद्दल असणारी मानसिक इच्छाशक्ती प्रचंड वाढते. त्यांना वाटत असते की, आपला मुलगा डॉक्टर व्हावा, आपली मुलगी इंजिनिअर व्हावी, आपला मुलगा कलेक्टर व्हावा आणि आपली मुलगी क्लासवन अधिकारी व्हावी, म्हणून अनेक पालक आपल्या अपेक्षांचे ओझे जबरदस्तीने आपल्या मुलांवर सोपवून मोकळे होताना दिसतात. मुलांची मानसिक इच्छाशक्ती त्या क्षेत्रात आहे किंवा नाही, याची खात्री न करता केवळ आपली इच्छा म्हणून बहुतांश पालक आपल्या मुलांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी मजबूर करतात.
मुलांची आवड लक्षात न घेता, त्यांचा बौद्धिक कल न ओळखता, त्यांची रुची कोणत्या क्षेत्रात आहे, हे न बघता केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या मोठेपणासाठी बहुतांश आईवडील आपल्या मुलांना डॉक्टर, कलेक्टर, अभियंता किंवा उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी अपेक्षांचे ओझे त्यांच्या मानगुटीवर लादतात. त्यासाठी भरपूर पैसा ओतून आपल्या मुलांना नामांकित क्लासेसला पाठवतात. चांगल्या व नामांकित कॉलेजला प्रवेश घेऊन देतात. बिचारे मुलेही आई-वडिलांच्या शब्दांचा मान ठेवून त्यांच्या इच्छेप्रमाणे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात पदार्पण करतात. आणि त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. परंतु त्या क्षेत्रात त्यांची म्हणावी तेवढी आवड नसल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश काही मिळत नाही. त्यांना यशाचे गाव काबीज करण्यासाठी वाटचाल अपयशाने करावी लागते. तेव्हा कुठे जबरदस्त अडथळ्याची शर्यत पार केल्यावर यश काबीज करता येते. म्हणून वाटचाल करताना कधी कधी अपयशालासुद्धा पचवावे लागते. अपयशाशिवाय यश मिळवणे शक्य नाही आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होणारा बहाद्दर अजून तरी जन्माला आला नाही. परंतु पालकांना मात्र आपला मुलगा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावा असे वाटत असते. ते कसे शक्य होईल हो?
या जगात जेवढे काही लोक यशस्वी झालेत त्यांना अपयशातून पुढे जावे लागले आहे. हे पालकांनी विसरता कामा नये. पण आजकालच्या पालकांना मुलाचे आलेले अपयश का सहन होत नाही. आपल्या मुलासाठी पालक एवढे क्रूर का बनतात? हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल प्रत्येक बापाची अशी मानसिकता झाली आहे की, मुलगा अपयशी झाल्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल, आपल्याला मित्रपरिवार, भावकी, गावकी आणि नातेवाईक काय म्हणतील? म्हणून हा राग ते आपल्या मुलांवर काढतात. त्यांना शिवीगाळ करतात. त्वेषाने बेदम मारून खडे बोल सुनावतात. तू माझ्या सामाजिक प्रतिष्ठेचा अपमान केलास. तुला एवढा पैसा ओतून चांगल्या क्लासेसला पाठवले, चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवून दिला आणि तू मात्र शेवटी मला यश दाखवण्याऐवजी अपयश दाखवलास. माझी सामाजिक प्रतिष्ठा कमी केलास. म्हणून त्याला बेदम मारहाण केली जाते. पण त्या आईवडिलांना कोण सांगणार की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयशाच्या वाटेने प्रवास केल्याशिवाय यशाला काबीज करता येत नाही. जीवनात अपयश आहे म्हणून यशाची व्याख्या करता येते. या जगात दहावी व बारावीला अपयश आलेले कित्येक मुले पुढे चालून हजारो तरुणांचे आयडॉल झाले आहेत.
लाखो युवकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. जे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात अपयशी ठरतात, ते विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होतात. आणि जे विद्यार्थी औद्योगिक क्षेत्रात अपयशी ठरतात ते विद्यार्थी कृषी क्षेत्रात आपले नाव कमावतात. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचा कल हा वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळा असतो. कोणी शैक्षणिक क्षेत्रात हुशार असतो, तर कोणी औद्योगिक क्षेत्रात तरबेज असतो. कोणी राजकीय क्षेत्रात चाणाक्ष असतो, तर कोणी कृषी क्षेत्रात जाणकार असतो. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांवर कोणत्याच अपेक्षांचे ओझे न ठेवता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी. मग पाहा तेसुद्धा नक्कीच संधीचे सोने करून दाखवतील. तुम्ही जर त्यांच्यावर नाहक अपेक्षांचे ओझे लादण्याचा प्रयत्न केला तर ते अपेक्षांचे ओझे पेलण्यात अपयशी ठरतील.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…