परीक्षण : डॉ. प्रतिभा जाधव
भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त सनदी अधिकारी, ज्येष्ठ तत्त्वचिंतक, उत्तम वक्ते, साहित्यिक आणि प्रखर प्रागतिक विचारवंत म्हणून बी. जी. वाघ हे नाव सर्वज्ञात आहे. ‘ताओवाद’ हा अस्पर्शीत विषय असो की, बुद्ध, जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वविचारांचे सखोल अभ्यासक या संदर्भाने बी. जी. वाघ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहेच परंतु इंग्रजी भाषेतही त्यांनी ढीरर्पिींळश्रळींू, हरीोपू रपव इरश्ररपलश, Aीीं ेष र्र्डीीींळरश्र, ढहश णपवर्ळींळवशव रिींह ही चिंतनात्मक पुस्तके लिहिलेली आहेत. मऊीशराी रपव ठशरश्रळींळशीफ हे इंग्रजीतील काव्यात्म विश्वचिंतन तसेच ‘विचारांच्या सावल्या’ हे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावरील त्यांचे चिंतनात्मक पुस्तकही प्रचंड गाजले.
बी. जी. वाघ यांचा वाचन व्यासंग, विश्लेषण शैली आणि तर्कनिष्ठ प्रागतिक भूमिका त्यांच्या लेखनात ओतप्रोत दिसते. त्यांच्या ‘ज्ञानसत्ता की धर्मसत्ता’ या लेखसंग्रहात एकूण 22 लेख असून, हे सर्व लेख ‘पीपल्स पोस्ट’फ या पाक्षिकातील ‘धर्म : एक चक्रव्यूह’ या लेखमालेत क्रमशः पूर्वप्रसिद्ध झालेले आहेत. अलीकडे धर्म ही अतीव संवेदनशील अशी बाब झाली आहे. धर्माबद्दलचे समज-अपसमज यांची चिकित्सा सदर लेखसंग्रहात वाघ यांनी अचूकपणे केलेली आहे. ही सर्व मांडणी करताना कोणताही विशिष्ट धर्म लेखकाच्या दृष्टीसमोर नाही, जी आहे ती मानवजातीची भयग्रस्तता. राजकारणी मात्र हे भय अधिक वाढवण्यासाठी वैचारिक, बौद्धिक षडयंत्र सतत रचत असतात हे सत्य निर्भयपणे बी. जी. वाघ मांडतात.
भगवान बुद्ध, महावीर, डॉ. आंबेडकर, बर्ट्रान्ड रसेल, जॉन ड्यू, महात्मा गांधी, सॉक्रेटिस, कान्ट, ग्रामसी, टॉलस्टॉय, थोरो, हेगेल, महात्मा फुले, पेरियार, मार्क्स या वैश्विक तत्त्वचिंतकांचे धर्मचिंतन आणि धर्मदृष्टीचा प्रत्यय सदर लेखांमध्ये ठिकठिकाणी आपणास येतो. लेखसंग्रहाची पाठराखण परिवर्तनवादी ज्ञानयोगी विनयशील धर्मचिकित्सक आदरणीय आ. ह. साळुंके यांनी केलेली आहे. त्यात ते लिहितात की, बी. जी. वाघ यांनी या पुस्तकात हाताळलेला विषय गंभीर व अतिशय महत्त्वाचा आहे. परंपरागत स्वरूपाचा, निकोप मानवी मूल्यांपेक्षा कृत्रिम कर्मकांडाला महत्त्व देणारा, विषमतेचे व शोषणाचे समर्थन करणारा आणि बर्याच प्रमाणात अज्ञानावर आधारलेला असा धर्म आणि सत्याला प्रमाण मानणारे ज्ञान त्यांच्यातील विरोध प्राचीन काळापासून चाललेला आहे. आज ज्ञानाला महत्त्व दिले तरच मानवजातीचे कल्याण होणार आहे, ज्ञानाच्या आधारे धर्मालाही नवी दिशा देऊन समृद्ध करणे शक्य आहे. त्यासाठी प्राचीन काळापासून जगातील विविध संस्कृतीतील माहितीचा आढावा घेणार्या विस्तृत स्वरूपातील सदर लेखसंग्रहाचे मी स्वागत करतो.
या संग्रहातील लेख बुद्धिजीवी वर्गासाठी महत्त्वाचे आहेतच; पण कोणताही झेंडा आणि विचार यांना बळी पडणार्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, सर्वसामान्य नागरिकांचे बुद्धीमंथन घडवून आणणारे सहज सुलभ शैलीतील सहसंदर्भ प्रभावी मुक्तचिंतनही आहे असे मला वाटते. मुळात माणसाला धर्माची आवश्यकता असते का? येथपासून त्याच्या निर्मितीचे मूळ माणसाच्या सार्वकालिक भयात व असुरक्षितेत आहे. धर्माचा संबंध सत्याशी तसेच उच्चतम नैतिक जाणिवांशीही आहे. परंतु लोक सामाजिक व राजकीय गरजांसाठीच धर्माचा वापर करतात, असे मत वाघ मांडतात जे टोकदार सत्य आहे. धर्माचे चुकीचे आकलन माणसाला धर्मांध करते. धर्माचे मारेकरी त्याच धर्माचे असतात. त्यामुळे जो धर्म माणसाला अविवेकी, तर्कदुष्ट किंवा हिंसक बनवतो त्याची आवश्यकता आहे का? असा सार्थ प्रश्न लेखक निर्माण करतो.
धर्म ही मानसिक गरज पुढे मानसिक गुलामगिरीत किंवा विकृतीत परिवर्तित होते. महात्मा गांधींचे धर्मचिंतन त्यांच्या प्रागतिक, वैश्विक अशा सत्याच्या प्रयोगात आहे. डॉ.आंबेडकर हे बुद्धांचे अनुयायी त्यामुळे ते वैचारिक गोंधळात सापडले नाहीत. त्यांनी बौद्धिक, मानसिक व नैतिक स्वातंत्र्यालाच सत्य मानले आहे. बुद्धाने ईश्वराऐवजी माणसालाच धर्माच्या केंद्रस्थानी आणले, त्याला विश्वनायक ठरवले. ईश्वर, आत्मा, वेद, यज्ञसंस्था, स्वर्ग-नरक, वर्णव्यवस्था या सर्व दलदलीतून त्याने माणसाला मुक्त करून बौद्धिक नैतिक स्वातंत्र्याची घोषणा केली.
सत्य ही अंतिमतः एक गतिमान संकल्पना आहे. सत्य शोधण्यासाठी आधी मनाचे व कर्माचे स्वातंत्र्य असावे लागते ते जातीव्यवस्थेत नव्हते.
सत्याच्या साधनेसाठी समाजव्यवस्था मुक्त असावी लागते. धसर्मव्यवस्थेने नीतिमत्ता, सामाजिक न्याय, समता-स्वातंत्र्य-बंधुता या मुल्यांचा विकास होऊ दिलेला नाही. धर्म आणि श्रद्धा, परंपरांच्या संगतीचा प्रवास सत्याऐवजी चक्रव्यूहाकडे, इतिहास हिंदुत्वाचा, धर्म:एक भयमूलक अज्ञान, हिंदू राष्ट्राचे मूळ ब्राह्मणयग्रस्त ब्राह्मणवादात, धर्माचे सामर्थ्य त्याच्या संदिग्धतेत, पंथ परंपरा आणि सहिष्णुता, सांस्कृतिक संघर्ष : धर्म-जाती-वर्ण-वर्ग, धर्मचिकित्सा, धर्म आणि सत्य, बुद्ध: नैतिक व बौद्धिक स्वातंत्र्याची घोषणा, धर्म: माणूस साधन नव्हे तर साध्य, क्रांती-प्रतिक्रांती, फॅसिझमचे मूळ : मनुस्मृती, भक्तीपंथ: धार्मिक स्वातंत्र्य व समतेसाठीचा संघर्ष, धर्मचिकित्सा/जातिनिर्मूलन, पाश्चात्य धर्म आणि तत्त्वज्ञान, धर्माचे भविष्यकालीन स्वरूप, धर्मनिरपेक्षतेचा युरोपियन प्रवास असे विविध विषय या तत्त्वचिंतनपर लेखसंग्रहात आहेत. हे सर्वच लेख सहसंदर्भ, चिंतनीय आणि समर्पक वास्तव उदाहरणांसह पूर्णत्वास आलेले आहेत. वाचकास ते नवी दृष्टी देतात, विचार करायला भाग
पाडतात आणि परिवर्तनशील करतात हे निश्चित!
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…