नाशिक : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार 22 मे ते 5 जून या कालावधीत विशेष जनजागृती मोहिमेंतर्गत पर्यावरणाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी यावर्षीची थीम प्लास्टिक प्रदूषणाचे जागतिक निर्मूलन अशी निश्चित केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात प्लास्टिकविरोधी जनजागृती, प्लास्टिक संकलन, पर्यावरण शपथ आणि वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सदरचे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक संकलनासाठी श्रमदान मोहिमा आयोजित करून कचरा संकलन व वर्गीकरण करण्यात आले.
काही गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसोबत रॅलीचे आयोजन करून प्लास्टिकविरोधी घोषणा देण्यात आल्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांच्या उपस्थितीत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात पर्यावरण शपथ घेण्यात आली आणि प्लास्टिकमुक्त परिसरासाठी जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.
प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे आपण स्वतःपासून सुरुवात करून प्लास्टिकमुक्त समाज घडवण्याचे व्रत घेण्याचे आवाहन यावेळी दीपक पाटील यांनी केले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सरपंच जिजाबाई लांडे, उपसरपंच सागर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी नागपुरे, विस्तार अधिकारी आर. डी. महाले, सपकाळे आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह जिल्हा व तालुका कक्षातील सल्लागार उपस्थित होते.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…