साधुग्राममधील 283 एकर संपादनाचा मार्ग मोकळा

शासनाकडून 2267 कोटी मंजूर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेने साधुग्राममधील एकूण 377 एकरपैकीे 94 एकर जागेचे संपादन केले आहे. परंतु, उर्वरित 283 एकरचे घोडे अडले होते. दरम्यान, साधुग्राममधील 283 एकर जागा ताब्यात घेण्यासाठी नाशिक महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये शासनाला जमीन संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. या प्रस्तावास शासनाने सकारात्मकता दर्शवत साधुग्राममधील संपादन करावयाच्या जमिनीसाठी तब्बल 2267 कोटी रुपये मंजूर केले आहे. यामुळे साधुग्राममधील संपादनाचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.
यापूर्वी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात साधुग्रामबाधितांची सुनावणी वाटाघाटी समितीकडून घेण्यात आली होती. साधुग्रामबाधितांनी फक्त रोख मोबदलाच घेण्याचा पवित्रा घेतला आहे. शहरात दीड वर्षानंतर सिंहस्थ होत असून, याकरिता हजार एकरची आवश्यकता लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नाशिकच्या जाहीर सभेतून बाराशे एकरवर सिंहस्थ होणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, महापालिका प्रशासनाला अद्यापपर्यंत साधुग्राममधील अत्यंत महत्त्वाच्या जागेचे संपादन करता आलेले नसताना, उर्वरित जागेचा तिढा कसा सोडवला जाईल, असा सवाल केला जात होता. मात्र, पालिकेने साधुग्रामचा विषय सोडवण्यासाठी 283 एकरचे क्षेत्र संपादन करण्यासाठी ज्या व्यक्ती, संस्थांच्या नावावर या जमिनी आहेत, त्यांची टप्प्याटप्प्याने पालिकेत सुनावणी घेतली. शेतकर्‍यांसह तेरा सामाजिक संस्थांनी त्यावेळी हजेरी लावली. त्यावेळी वाटाघाटी समितीच्या सदस्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत पालिका किती मोबदला देऊ शकते, याबाबतची कल्पना देण्यात आली होती. दरम्यान, मुंबईत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2267 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.

वाटाघाटी समितीची पुनर्रचना
साधुग्राममधील 377 एकरपैकी 60 एकर क्षेत्र सामाजिक संस्थांकडे आहे. तर उर्वरित 223 एकर जमिनीसाठी शेतकर्‍यांची सुनावणी घेण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली वाटाघाटी समितीची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या समितीची पुनर्रचना करण्यात आली. या समितीत नगररचनेचे उपसंचालक, सहायक संचालक, मुख्य लेखा वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, विधी विभागप्रमुख, शहर अभियंता, अधीक्षक अभियंता हे या समितीमधील सदस्य आहेत.

Path cleared for acquisition of 283 acres in Sadhugram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *