पाथर्डी गाव परिसरात बिबट्या जेरबंद

सिडको :   विशेष प्रतिनिधी

पाथर्डी गावं नांदुर मळे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकुळ घालणारा बिबट्या सकाळच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंज-यात जेरबंद झाल्यामुळे शेतक-यांसह मळे परिसरात वस्ती करुन वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला
पाथर्डी गाव नांदुर मळे परिसरातील गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी कुत्रे तसेच वासरं फस्त केले होते तर अनेकांना रात्री अपरात्री बिबट्याचे दर्शन होत होते बिबट्याचा सततच्या वावरामुळे परिसरातील शेतक-यांसह मळेभागात वास्तव्यासह असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सध्या शालेय परिक्षा सुरू आहेत मात्र या परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे विद्यार्थी तसेच पालकसुद्धा भयभीत झाले होते परिसरात होत असलेल्या बिबट्याचा मुक्त संचार बाबत वनविभागाला कळविण्यात आले होते त्यानुसार वनविभागाने सुकदेव पोरजे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता नेहमी प्रमाणे याभागात शिकार शोधत असतांना सकाळी सहावाजेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंज-यात हा बिबट्या अडकल्यामुळे शेतक-यांसह मळे परिसरातील वस्ती करुन रहाणा-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला

पांडवलेणी परिसरासह पाथर्डी ,गौळाणे, वडनेर, नांदुर यासह मिल्ट्री कँम्प परिसरात बिबट्याच्या सतत मुक्त संचार होत असतो हे बिबटे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीत फिरत असताना हे नरभक्षक आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे या नरभक्षक बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करुन परिसरात शेतकर्‍यांसह मळे परिसरात वस्ती करुन रहाणा-यांना भयमुक्त करावे
त्रंबक मामा कोंबडे
शेतकरी तथा विभागप्रमुख
शिवसेना (उबाठा गट)

Bhagwat Udavant

Recent Posts

श्रमिकनगरला टवाळखोरांनी वाहनांच्या काचा फोडल्या

नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…

4 hours ago

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…

20 hours ago

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

3 days ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

3 days ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

4 days ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

4 days ago