नाशिक : अश्विनी पांडे
तब्बल दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. दुपारपर्यंत कडक उन्हाची अनुभूती घेतलेल्या नाशिककरांची सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. त्यामुळे नागरिकांची, वाहनधारकांची झाली. ठिकठिकाणी पावसाचे तळे साचले. महापालिकेच्या राजीव गांधी भवनजवळही मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
अचानक झालेल्या पावसामुळे नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाली. जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे गोदावरीला पूरही आला होता. मात्र गेल्या काही दिवासापासून शहरात पावसाची उघडडीप सुरू होती. ऐन पावसाळ्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक उन्हाच्या झळांनी हैरान झाले होते. मात्र काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या झळा सोसणार्या नाशिककरांना दिलासा मिळाला.
गेल्या काही दिवसात वातावणात होणार्या सततच्या बदलामुळे मात्र आरोग्याच्या समस्येत चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. शहरात हिव तापाने आजारी पडणार्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बदल्यात वातावणात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नाशिककरांसमोर निर्माण झाले आहे. श्रावण महिन्यात सतत ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. मात्र या ऊन पावसाचे आरोग्यावर परिणाम होत असल्याने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. काल दुपारनंतर झालेल्या पावसानंतर शहरातील काही भागात विजेचा लंपडाव सुरू होता. तर अनेक भागात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण जात होते. येत्या काही दिवस शहरात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या चात ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…
कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…
उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…
रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…