कृषी विभाग, पोलिसांच्या कारवाईत संशयितावर गुन्हा दाखल
मालेगाव: प्रतिनिधी
शहरातील हिम्मतनगर परिसरात कृषी विभाग व कॅम्प पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत तब्बल पाच लाख 47 हजार रुपयांचा अनधिकृत कीटकनाशकांचा साठा जप्त केला. याप्रकरणी संबंधित संशयितावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी दिली.
गोपनीय माहितीनुसार हिम्मतनगर येथील सार्वजनिक शेडमध्ये अनधिकृत कीटकनाशकांचा साठा असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कृषी विभाग व कॅम्प पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून तपासणी केली असता प्रवीण अशोक देवरे याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना कीटकनाशके साठवून ठेवलेली आढळली.
जप्त केलेल्या कीटकनाशकांचे नमुने घेऊन पुढील तपासणीसाठी औरंगाबाद येथील कीटकनाशक परीक्षण प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
दरम्यान, कोणत्याही व्यक्तीने विनापरवाना कीटकनाशकांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा विपणन केल्यास कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच शेतकर्यांनी पावतीशिवाय फिरत्या विक्रेत्यांकडून खते, बियाणे किंवा कीटकनाशके खरेदी करू नयेत आणि संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम, कीटकनाशक निरीक्षक शुभम नाझीरकर, मंडळ कृषी अधिकारी सुरज गावडे व पंचायत समिती कृषी अधिकारी भीष्मा पाटील उपस्थित होते.
ही कीटकनाशके केली जप्त
कारवाईदरम्यान सुमारे 3 लाख 80 हजार रुपये किमतीचे 1900 किलो फोरेट 10टक्के ग्रॅन्युलर (38 ड्रम), 40 हजार रुपये किमतीचे 250 किलो, क्लोरोपायरीफॉस 10 टक्के, ग्रॅन्युलर (5 ड्रम), 78 हजार रुपये किमतीचे 300 किलो फोरेट 10 टक्के, ग्रॅन्युलर (6 ड्रम) तसेच 49 हजार रुपये किमतीचे 700 किलो फेनवलरेट 0.4 टक्के, डीपी (14 गोण्या) असा एकूण पाच लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Pesticide stock worth Rs 5.47 lakh seized in Himmatnagar
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…