पेठ : वार्ताहर तालुक्यातील कुंभाळेपैकी मोहाचापाडा शिवारात कमलाकर पुंडलिक पवार, रा. हातरूंडी, ता पेठ या शेतकर्याचा चाकूने वार करुन निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली. पेठ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहपाडा शिवारातील धर्मराज परशराम राऊत यांच्या शेताच्या कडेला तालुक्यातील हातरुंडी येथील कमलाकर पुंडलिक पवार (वय 40 वर्ष) यांची काल दुपारी अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करुन हत्या केल्याची फिर्याद मयताचे वडील पुंडलिक पवार यांनी दिली आहे. खूनाचे कारण आणि मारेकरी अज्ञात असून शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पेठ पोलीस करीत आहेत.