अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवत विनयभंग

नाशिक : शहरातील दोघा अल्पवयीन मुलींशी ओळख वाढवित त्यांचा विश्‍वास संपादन करत विनयभंग केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोक्सोसह गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी रोड येथे राहणार्‍या संशयित सोहम वनमाळी या तरुणाने राजीवनगर येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत एक नोव्हेंबर ते 10 मे 2022 दरम्यान ओळख वाढवित तिचा विश्‍वास संपादन केला. तिच्या व्हॉट्सऍपवर अश्‍लिल संदेश पाठविले. त्यानंतर तिला व्हिडीओ कॉल करत अश्‍लिल कृती करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्याकडे पैशांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर बदनामी करेल असे सांगत तिचा विनयभंग केला. दुसरी घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. संशयित नितीन खातळे (रा. करुळे, ता. इगतपुरी) याने अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवित तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी संपर्कात राहण्यासाठी मोबाइल देखील घेऊन दिला. याबाबत पीडित मुलीच्या घरच्यांना समजले असता त्यांनी संशयितास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने थेट तिच्या पालकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पालकांच्या तक्रारीवरुन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *