महागाईच्या आगीत पेट्रोल, डिझेलचा भडका,इतक्या रुपयांची वाढ

चार वर्षांनंतर मोठी इंधन दरवाढ; नाशिकमध्ये पेट्रोल 107.93 तर डिझेल 94.41 रुपये
नाशिक : प्रतिनिधी
तब्बल चार वर्षांनंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात  वाढ करण्यात आली असून त्याचा फटका नाशिककरांनाही बसला आहे. 15 मे 2026 पासून नाशिक शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 107.93 रुपये तर डिझेलचा दर 94.41 रुपये झाला आहे. कंपनी तसेच पेट्रोल पंपाच्या स्थानानुसार या दरात सुमारे 15 पैशांपर्यंत फरक असू शकतो.

यापूर्वी मे 2021 मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग वाढ करण्यात आली होती. त्या काळात देशभरात इंधनाचे दर जवळपास दररोज वाढले होते.  मे 2021 मध्ये पेट्रोलमध्ये ₹3.83 तर डिझेलमध्ये ₹4.42 प्रति लिटर वाढ झाली होती. मुंबईसह अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली होती.

सध्याची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, मध्यपूर्वेतील तणाव आणि तेल कंपन्यांवरील वाढता आर्थिक भार यामुळे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याबरोबरच भाजीपाला, दूध व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

One thought on “महागाईच्या आगीत पेट्रोल, डिझेलचा भडका,इतक्या रुपयांची वाढ

  1. युद्ध, जागतिक राजकारण आणि आर्थिक संघर्ष यांची सर्वात मोठी किंमत शेवटी सामान्य नागरिकालाच चुकवावी लागते, हीच या परिस्थितीतील सर्वात वेदनादायक वस्तुस्थिती आहे.
    पेट्रोल-डिझेल दरवाढ ही केवळ इंधन महागल्याची बातमी नसून ती सर्वसामान्यांच्या वाढत्या आर्थिक असुरक्षिततेची आणि महागाईच्या वाढत्या दडपणाची गंभीर जाणीव करून देणारी घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *