इंदिरानगर| वार्ताहर
अश्लील फोटो व व्हिडिओ प्रेयसीच्या पतीलाच पाठवल्याने प्रियकराला गजाआड जावे लागले. पतीला सोडून आपल्यासोबत संसार थाटावा या हेतूने संशयिताने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे .
मिळालेल्या माहितीनुसार,लग्नापूर्वी पीडिता ही आई सोबत रहात होती. पीडिता व संशयित यांची जळगाव येथे ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडिता हिने वेळोवेळी लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र संशयित त्यावेळी लग्न करण्यास तयार नव्हता. दुसरीकडे लग्न करून घे असा तो पीडितेला सांगत होता. त्यानुसार तिने दुसरीकडे लग्न केले. ही बाब समजताच संशयिताने पीडितेच्या पतीचा नंबर मिळवला.पतीला सोडून त्याच्यासोबत संसार करण्यासाठी त्याने आग्रह धरला. चाळीसगाव येथे पीडिता गेली असता त्याने पुन्हा लग्नाचा आग्रह धरला. मात्र पीडितेने संशयितासोबत लग्न करण्यास नकार दिला.त्यामुळे संतप्त संशयिताने दोघांमधील शरीर संबंधाचे फोटो व व्हिडिओ टेलिग्राम अॅप द्वारे पीडितेच्या पतीला पाठवले. यावरून पती पत्नी मध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे पिडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग व आय टी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निसार सय्यद करत आहेत.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…