नाशिकरोड : जेल रोड परिसरातील ख्रिश्चन कॉलनीत राहणार्या 38 वर्षीय महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सोनाली आनंद त्रिभुवन (वय 38) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली यांनी आपल्या राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन केले. ही घटना नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, तब्येत अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
अग्रलेख *शस्त्रसंधी की तह?* ... *चंद्रशेखर शिंपी* 9689535738 सहसंपादक, दैनिक गावकरी ... दोन दिग्गज संघांमध्ये…
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले खासगी एजंटही जाळ्यात नाशिक: प्रतिनिधी गावातील 60 रेशनकार्ड काढून…
ऑक्सिजन सिलिंडरच्या साथीने मिळवले दहावी परीक्षेत यश शहापूर : साजिद शेख निरोगी आयुष्याबरोबर प्रयत्न करून…
पाणवेली काढण्याचे काम अंतिम टप्प्यात निफाड : प्रतिनिधी तालुक्यातून वाहणार्या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेलींनी…
गुन्हे शाखा युनिट-2 ची उल्लेखनीय कामगिरी सिडको : विशेष प्रतिनिधी गेल्या तीन वर्षांपासून विनयभंगाच्या गुन्ह्यात…
दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी तालुक्यासह सुरगाणा पेठ व इतर ठिकाणी अवकाळी पावसाने सलग दोन ते…