नाशिक

‘त्या’ जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलीस उतरले रस्त्यावर; 70 टवाळखोरांना बेड्या

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड येथील वास्को हॉटेलसमोर बुधवारी रात्री एका युवकावर झालेल्या अत्यंत थरारक आणि प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण नाशिक शहर हादरले आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने नाशिककरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. वाढत्या गुन्हेगारीच्या या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा गुरुवारी सायंकाळी नाशिकरोडच्या रस्त्यावर उतरला. पोलिसांनी परिसरात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवून 70 हून अधिक टवाळखोरांवर धडक कारवाई केली.

बुधवारी रात्री वास्को हॉटेलसमोरील चौकात पूर्ववैमनस्यातून किंवा किरकोळ वादातून एका युवकावर धारदार शस्त्रास्त्रांनी क्षणार्धात जीवघेणा हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका भीषण होता की, परिसर रक्ताने माखला. या थरारक घटनेचे चित्रण शेजारील नागरिकांनी मोबाइलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वार्‍यासारखा पसरल्याने कायद्याच्या सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे
वातावरण आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी आणि व्हायरल व्हिडिओमुळे निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेता, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिसांचे विशेष पथक गुरुवारी रात्रीच रस्त्यावर उतरले.
या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, कोरडे, आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्यासह तब्बल 15 अधिकारी आणि 70 पोलीस कर्मचार्‍यांच्या फौजफाट्याने संपूर्ण नाशिकरोड परिसरात रात्रीचा दिवस केला.
पोलिसांनी गुरुवारी रात्री नाशिकरोड परिसरातील सर्व संशयित कट्टे, हॉटेल्स आणि चौकांमध्ये रात्रभर जोरदार कोम्बिंग ऑपरेशन (सर्च मोहीम) राबवले. यावेळी परिसरात विनाकारण फिरणारे, भाईगिरी करणारे आणि संशयास्पद हालचाली करणार्‍या तब्बल 70 हून अधिक टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या या सर्व टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायदा कलम 112 आणि 117 अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांनी रात्रीच त्यांची चांगलीच
शाळा घेतली.
हल्ल्याच्या घटनेनंतर नाशिकरोड परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. “शहरातील शांतता भंग करणार्‍या आणि कायदा हातात घेणार्‍या गुंडांची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. रहिवाश्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

Police hit the streets after ‘that’ deadly attack; 70 hooligans arrested.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago