नाशिक

गर्भवती महिलांना मोफत प्रसूतिपूर्व सेवा

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान दशकपूर्तीनिमित्त विशेष आरोग्य शिबिरे

नाशिक : प्रतिनिधी
‘माझं गाव-आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यात 9 जून रोजी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये गर्भवतींसाठी विशेष आरोग्य शिबिरे व जनजागृती मोहीम आयोजित केली आहे.
नाशिक जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला यशस्वी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने ‘माझं गाव-आरोग्यसंपन्न गाव’ संकल्पनेंंतर्गत जिल्ह्यातील सर्व आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांत विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत गर्भधारणेच्या दुसर्‍या व तिसर्‍या तिमाहीतील महिलांना दर महिन्याच्या 9 तारखेला तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत प्रसूतिपूर्व आरोग्यसेवा, रक्त व लघवी तपासणी, समुपदेशन, तसेच आवश्यकतेनुसार सोनोग्राफीसाठी संदर्भ सेवा दिली जात आहे. उच्च जोखमीच्या गर्भवतींची विशेष नोंदणी करून त्यांच्यावर उपचार व नियमित पाठपुरावा केला
जाणार आहे.
आशा स्वयंसेविका व सहायक परिचारिका यांच्यामार्फत उच्च जोखमीच्या गर्भवतींच्या घरी किमान तीन पाठपुरावा भेटी सुनिश्चित करण्यात येणार आहेत. दुर्गम भागातील महिलांपर्यंत ही सेवा पोेहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पीएमएसएमएची दहा वर्षे-सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत या घोषवाक्यांतर्गत जनजागृती मोहिमाही राबविण्यात येत आहेत.

आपले गाव आरोग्यसंपन्न करायचे असेल तर माता व बाळ निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. ‘माझं गाव- आरोग्यसंपन्न गाव’ या भावनेतून नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त गर्भवतींंनी पुढे येऊन या मोफत, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा.
– डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, नाशिक

Free prenatal services for pregnant women

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago