भावली धरणावर पोलिसांची नजर

पर्यटकांची तुफान गर्दी; अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त

इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण आणि कोसळणार्‍या पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी रविवारी (दि. 19) भावली धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. मागील आठवड्यात याच ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तालुक्यात सध्या कोसळणार्‍या पावसाच्या सरी, दाट धुके, वेगाने वाहणारे वारे आणि उंचावरून पडणारे धबधबे यामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याने पोलिसांनी भावली धरणाकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांची कसून चौकशी केली. तसेच सुरक्षिततेचा उपाय म्हणून पर्यटकांना धरण परिसरातील धोकादायक ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Police keeping a watch on Bhavli Dam.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *