चिमुकलीचा खून करत पोलीस पित्याने स्वतःही घेतला गळफास

नाशिकरोड ,: विशेष प्रतिनिधी

पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीला गळफास देऊन खून केला आणि त्यानंतर  स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नाशिकरोड परिसरात घडली. या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की स्वप्निल दीपक गायकवाड (वय 34) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी आपल्या मुलीचा गळफास देऊन खून केल्यानंतर स्वतःही फाशी घेऊन आयुष्य संपवले.

स्वप्निल गायकवाड हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. भैरवी स्वप्निल गायकवाड (वय 6) हिस पाळणा बांधण्याच्या लोखंडी हुका ला गळफास देऊन तिची हत्या करूनच आत्महत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्वप्निल गायकवाड यांचा काही महिन्यांपूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला होता. कौटुंबिक कलह आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हत्या आणि आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ सहा वर्षांची निष्पाप मुलगी पित्याच्या हातून मृत्यूमुखी पडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

वृद्ध आई वडील एकाकी

पोलीस अंमलदार स्वप्निल गायकवाड यांच्या पश्चात केवळ वृद्ध आई-वडील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका भावाचा गंभीर आजाराने मृत्यू झाला होता, तर दुसऱ्या भावाने पाच वर्षापूर्वी रेल्वे खाली आत्महत्या केली होती. त्यांच्या वृद्ध मातापित्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहे

काही दिवसांपूर्वी याच परिसरात वृद्ध पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून हत्या केली होती व नंतर स्वतः वृद्ध पतीने गळफास घेतला होता तसाच प्रकार आज घडल्याने परिसरात चर्चेचा विषय होता.

Bhagwat Udavant

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

1 hour ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

1 hour ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

1 hour ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

1 hour ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

2 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

2 hours ago