नाशिक

इगतपुरी पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था

शेतकरीवर्गासह वाहनधारक त्रस्त

वासाळी : वार्ताहर
मान्सून उंबरठ्यावर आला आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात तीन महिन्यांपासून खोदून ठेवलेले रस्ते त्याच स्थितीत असून, पावसाळ्यात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून, सदर कामे त्वरित सुरू करण्याची मागणी वासाळीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) तालुकाध्यक्ष काशीनाथ कोरडे यांनी केली आहे.
अधरवड फाटा ते टाकेद हा साधारण सहा किमीचा घोटीकडे जाणारा नेहमी वर्दळीचा रस्ता आहे. पूर्वीचा अरुंद रस्ता आता मोठा करण्याच्या नावाखाली तीन महिन्यांपूर्वी मोठ्या मोर्‍या बसविण्यासाठी रस्ता अर्धवट खोदून ठेवला आहे. यासाठी पर्यायी कच्चा रस्ता तयार करण्यात आला असून, तीन महिन्यांपासून काम बंद आहे. यामुळे पावसात चिखल होऊन वाहतूक बंद होऊ शकते. रस्ता रुंदीकरण करताना बाधित शेतकरी नुकसानभरपाई मागत आहेत. त्याशिवाय, ते काम करू देत नाहीत. याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घेऊन संबंधित बाधितांना नुकसानभरपाई मिळावी, ही त्यांची मागणी आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढून काम पूर्ण करावे, अशी परिसरातून मागणी होत आहे.
निनावी ते इगतपुरी हा काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी पूर्वीचा रस्ता खोदून नवीन रस्ता तयार करत आहेत. सध्या तीन महिन्यांपासून वासाळी ते सोनोशी हा अतिशय वर्दळीचा रस्ता खोदून ठेवला आहे. या खोदाईमुळे वाहनधारक, शाळेला जाणारी मुले, शेतकरी, रस्ताकडेला राहणारी माणसं धुळीने बेजार झाली आहेत. उघडी पडलेली खडी, माती यामुळे रस्त्याने चालणे कठीण झाले आहे. तुटलेल्या फुटलेल्या मोर्‍या याकडे अधिकार्‍यांचे अजिबात लक्ष नाही. भगदाड पडलेल्या मोर्‍या दुरुस्त करण्याऐवजी त्यामध्ये दगड, मुरूम टाकून त्या बुजवतात व पावसाळ्यात सर्व पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक विस्कळीत होते.
शेतकर्‍यांचे शेतात पाणी जाऊन नुकसान होते आहे. टाकेद ते बांबळेवाडी हा निकृष्ट दर्जाचा रस्ता वारंवार तक्रार करूनही कधीच दुरुस्त झाला नाही. यामुळे अपघात होत आहेत. माजी सरपंच तथा शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष काशीनाथ कोरडे यांनी वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. परिसरात म्हैसवळण घाट रस्ता अर्धवट झाला असून, बाकी काम बंद आहे. अशी बरीच कामे रखडली असून, याकडे कुणीही राजकीय नेते लक्ष देत नसल्याने परिसरात सर्वत्र नाराजी
पसरली आहे.

Poor condition of roads in Igatpuri East area

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago