नाशिक

अंबड एमआयडीसीतील सहा कोटींच्या रस्तेकामाला ब्रेक

सोशल मीडियावर वादाला चढला रंग

सिडको : प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्थेत असलेल्या अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मंजूर झालेल्या सहा कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अडथळा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कथित टक्केवारीच्या वादातून संबंधित ठेकेदारावर काम बंद करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप प्रभागातील दुसर्‍या लोकप्रतिनिधीकडून करण्यात आल्याने सिडको परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अंबड एमआयडीसीतील फ्रेशअप बेकरी परिसरासह अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब झाली होती. खड्डे, तुटलेले रस्ते आणि वाहतुकीतील अडचणींमुळे उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी तसेच आमदार सीमा हिरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर महापालिकेमार्फत संबंधित कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने भुयारी गटार आणि काँक्रिटीकरणाच्या पूर्वतयारीची कामे सुरू केली. कामाच्या प्रारंभी परिसरातील काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही उपस्थित होते. मात्र, काम सुरू झाल्यानंतर अचानक विरोध झाल्याचे समोर आले आहे. एका लोकप्रतिनिधीने ‘प्रथम भेट घ्या, त्यानंतरच काम सुरू करा’, असा संदेश देत काम थांबविण्याचे निर्देश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. कथित टक्केवारीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा दावा काही लोकप्रतिनिधींनी केला असून, विकासकामांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात असतानाच, ते पुन्हा थांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, एका लोकप्रतिनिधीने संबंधित व्यक्तीचे नाव नमूद करणारा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे. या संदेशानंतर विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून, आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे.
तथापि, आरोप करण्यात आलेल्या लोकप्रतिनिधीकडून यासंदर्भात अधिकृत भूमिका समोर आलेली नसल्याने या प्रकरणातील वस्तुस्थितीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या सर्व घडामोडींमुळे अंबड एमआयडीसीतील विकासकामांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Road work worth Rs 6 crore in Ambad MIDC put on hold

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago