सिडको : विशेष प्रतिनिधी
उशिरा का होईना, महापालिकेने फडोळ मळा ते अंबड गाव दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खड्ड्यांमध्ये योग्य तंत्र न वापरता बारीक खडी टाकल्याने रस्ता अपघातमुक्त न होता अधिकच अपघातप्रवण झाला आहे.
या रस्त्यावर दुचाकीस्वारांच्या अपघातात वाढ झाली असून, मनपाच्या बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फडोळ मळा ते अंबड गाव दरम्यानचा परिसर नव्याने विकसित होत असून, याठिकाणी अनेक कंपन्यांचे कामगार, व्यावसायिक आणि उद्योजक वास्तव्यास आहेत. तरीही मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती. या खड्ड्यांविरोधात भारतीय जनता पक्षाचे चिटणीस शरद फडोळ, तानाजी फडोळ, उत्तम मटाले यांच्यासह ग्रामस्थांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. महापालिकेने अखेर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. मात्र, यामध्ये प्रथम दगड टाकून रोलर फिरवण्यात आला आणि त्यावर फक्त शिंपडल्यासारखे डांबर टाकून त्यावर बारीक खडी टाकण्यात आली. परिणामी हे द्रुतगती काम अपघातांचे कारण ठरू लागले. खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
स्थानिक नागरिकांनी यामागे महापालिकेतील अधिकार्यांचा आणि ठेकेदारांचा संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. रस्त्याच्या प्रश्नांवर आता नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
सदरहू रस्ता हा नवीन करण्याची आमची मागणी होती. मात्र, महापालिकेने खड्डे बुजवायला सुरुवात केली. असे करत असताना खड्ड्यांमध्ये कच टाकून महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहे का? यावर तत्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– शरद फडोळ, चिटणीस, भाजप नाशिकसदरहू ठिकाणी कचदेखील टाकण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने यावर डांबरीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच येथे डांबरीकरण करण्यात येईल.
– हेमचंद्र नांदुर्डीकर, उपअभियंता, बांधकाम विभाग, नवीन नाशिक
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…
प्रारूप प्रभाग रचनेत एकाची भर; 31 ऑगस्टपर्यंत हरकतींसाठी मुदत सिन्नर : प्रतिनिधी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती मनमाड : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून डोळे…
त्र्यंबकेश्वर : वार्ताहर त्र्यंबकेश्वर येथे स्वातंत्र्यदिनासह सलग शासकीय सुट्ट्यांनी गर्दीचा महापूर आला. येथील व्यवस्था कोलमडून…
नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज नाशिक : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात…
एक लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली…