नाशिक

दुचाकी चोरी करणारे दोन चोरटे अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; चोरीच्या 10 दुचाकी जप्त, 7 गुन्हे उघडकीस

सिन्नर : प्रतिनिधी
मोटारसायकल चोरी करून त्यांची विक्री करणार्‍या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढुर्ली परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांकडून चोरीच्या तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून चोरीचे सात गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, टोळीचा म्होरक्या मात्र फरारी आहे.

अजय दत्तात्रय दळवी (21) रा. विंचूरदळवी, भावदेववाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक आणि अनिकेत श्रीधर मानकर (24) रा. राहुरी – भगूर पांढुर्ली रोड ता. जि. नाशिक अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके रा. विंचूरदळवी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चिंचोली येथील चोरलेल्या एका दुचाकीच्या शोधार्थ पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत काही चोरटे चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी पांढुर्ली येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पांढुर्ली चौफुली परिसरात सापळा रचून चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली, सिन्नर शहर, कुंदेवाडी, घोटी, वणी, संगमनेर, श्रीरामपूर परिसरातून 10 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यातून सात गुन्हे हे उघडकीस आले आहे.
जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरट यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

या दुचाकी केल्या जप्त

गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या 4 हिरो स्प्लेंडर, एक बजाज 220 पल्सर, 1 बजाज प्लॅटिना, 2 बजाज पल्सर, 1 रॉयल एनफिल्ड बुलेट, 1 होंडा यूनिकॉर्न अशा एकूण चोरीच्या 10 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या. त्यांची किंमत 8 लाख 35 हजार रुपये इतकी आहे. सिन्नर पोलीस स्टेशनकडे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात या मोटरसायकल चोरांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago