नाशिक

नाशिक रोड स्टेशनवर पाकीटमार जेरबंद

शिलापूर : प्रतिनिधी
नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशाचे पाकीट लांबविणार्‍या दोन चोरट्यास रेल्वे पोलिसांनी अवघ्या सात तासांत जेरबंद करीत मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद विश्राम मांजरेकर (रा. नवी मुंबई) नाशिक ते मुंबई असा प्रवास करण्याकरिता कामयानी एक्सप्रेसच्या मागील जनरल डब्यात रेल्वे स्टेशन नाशिकरोड प्लॅटफॉर्म नंबर तीनवर मागील डब्यात चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या मागील खिशात ठेवलेले एक ब्राउन रंगाचे पाकीट, त्यातील रोख रक्कम 14 हजार रुपये, पॅन कार्ड, डिझेल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स असा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करताच प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांनी पोलिसांचे तपास पथक तयार करून त्यांना तपास करण्याबाबत सांगितले. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे मनीष कुमार यांना मदतीस घेऊन नाशिक रोड रेल्वे स्टेशन हद्दीत शोध घेतला असता गुप्त माहिती देणार्‍या खबर्‍यांकडून हनुमान मंदिराजवळ दोन जण भांडत असल्याचे सांगितले. ते तत्काळ तेथे दाखल होत त्यांना नाव विचारले असता, आमिन यासीन शेख (वय 34, रा. सील गमीन कॉलनी, सवेरा हॉटेल समोर. छत्रपती संभाजीनगर), शेख झाकीर उद्दीन शेख जाहीर-उद्दीन (वय 42, रा. इंदिरानगर, न्यू बाहिजापुरा गल्ली नंबर एक, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक ब्राउन रंगाचे पाकीट मिळाले.
त्यात प्रमोद मांजरेकर यांचे नावाचे पॅन कार्ड दिसले व त्यात रोख रक्कम 12 हजार रुपये व इतर कागदपत्रे मिळाली. त्यांना उर्वरित रक्कम विचारली असता मद्यपान व जेवणासाठी खर्च केल्याचे सांगितले व गुन्हा केल्याचे कबूल केले. पोलीस उपनिरीक्षक संजय केदारी यांनी दोघांस ताब्यात घेत अटक करत बेड्या ठोकल्या.
ही कामगिरी विभागीय अधिकारी स्वाती भोर, संजय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, उपनिरीक्षक संजय केदारे, हवालदार शैलेंद्र पाटील, संदीप उगले, राज बच्छाव, रघुनाथ सानप, कॉन्स्टेबल सुभाष काळे, विशाल धांडे व रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रतापसिंह, आरक्षक मनीष कुमार यांनी केली.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

8 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

8 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

8 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

8 hours ago