नाशिक

जीव धोक्यात घालून रात्रीतून वीजपुरवठा सुरळीत

महावितरण कर्मचार्‍यांच्या धाडसाचे कौतुक; ग्राहकसेवेला प्राधान्य

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यात शनिवारी (दि. 14) सायंकाळी वादळ अन् विजांच्या कडकडाटात ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले, तारा तुटल्याने अवघ्या तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी रात्री पावसात चिखल तुडवत वीजपुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे व धाडसाचे कौतुक होत आहे.
तालुक्यात वादळासह गारपिटीने निफाड शहरासह नैताळे, नांदूरमध्यमेश्वर, खेडलेझुंगे, देवगाव, पिंपळस, कसबे सुकेणे, निसाका, सायखेडा परिसरातील महावितरण कंपनीच्या 33 केव्ही लाइनवर अडथळे निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या सर्व उपकेंद्रांना रानवड येथून वीजपुरवठा केला जातो. मात्र, यातील 33 केव्ही लाइनवरील पिन इन्शुुलेटर ठिकठिकाणी फुटले व वीजवाहक तारा खाली आल्या. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देवगाव, खेडलेझुंगे, पिंपळस, नांदूरमध्यमेश्वर तसेच निफाड ग्रामीण कक्षातील कर्मचार्‍यांनी लागलीच विशेष मोहीम हाती घेतली.
या मोहिमेत पावसाचा व्यत्यय येत होता. जमिनीवर पाणी साचलेले तसेच विजांचा कडकडाट असताना महावितरण कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता ग्राहकसेवेला महत्त्व दिले व भरपावसात खंडित वीजपुरवठा रात्रभर अथक प्रयत्न करून पहाटेपर्यंत सुरळीत केला.
या मोहिमेत निफाडचे कार्यकारी अभियंता नीलेश महार, तसेच निफाड उपविभागात नव्यानेच रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता सुनील राऊत स्वतः कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्यासाठी रात्रभर जनमित्रांसमवेत उपस्थित होते. या मोहिमेत सहाय्यक अभियंते हेमंत शिनकर, जितेंद्र बोरसे, साकेत पाटील, स्वप्नील सवई व राहुल भगत यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले.
जनमित्रांमध्ये श्री. हांडगे, कुमावत, सांगळे, जगदाळे, प्रवीण पवार, विजय पवार, शिंदे, अकिब, दिघे, सुनील, साहिल चांदोरे आदींसह तिन्ही कक्षांचे जनमित्र व कर्मचारी उपस्थित होते.

कठीण परिस्थितीत काम फत्ते
रात्री कोसळत असलेला पाऊस, कडाडणार्‍या विजा, ठिकठिकाणी साचलेले पाणी, सर्वत्र अंधाराचे साम्राज्य अशा कठीण परिस्थितीत महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केल्याने वीजग्राहकांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

14 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

14 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

14 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

14 hours ago