निफाड : तालुका प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची घंटा आजपासून (दि. 16) सर्वत्र वाजणार आहे. शिक्षण विभाग चिमुकल्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
प्रवेशोत्सवानिमित्त निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरात चिमुकल्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी बालकांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी वर्गात रांगोळी, फलकलेखन, शैक्षणिक तक्ते, सुविचार, चित्रकार्ड, पताका, फुगे लावून वर्गाची सजावट केली. नवागतांच्या स्वागतासाठी संस्थाध्यक्ष वि. दा. व्यवहारे, सचिव रतन वडघुले व विश्वस्त मंडळ, निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षण विभागाचे अधिकारी आदींच्या हस्ते मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असे मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे यांनी सांगितले. शाळेतील शिक्षक शालेय परिसर सफाई, वर्गसजावट, शाळा सजावटीसाठी प्रयत्न करत आहेत.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…