प्रशांत किशोर यांनी भाजपचा 30 वर्षांचा बालेकिल्ला केला उद्ध्वस्त

बिहारच्या बांकेपूरमध्ये ऐतिहासिक विजय

बांकेपूर/पाटणा : प्रतिनिधी
राजकीय रणनीतीकार ते राजकारणी असा प्रवास करणारे जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहारमधील बांकेपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 18,953 मतांच्या फरकाने पराभव केला. किशोर यांना तब्बल 63,203 मते मिळाली, तर सिन्हा यांना 44,250 मतांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे प्रशांत किशोर हे जन सुराज पक्षाचे पहिले आमदार ठरले आहेत, तर राष्ट्रीय जनता दलाच्या रेखा कुमारी 14,085 मतांसह तिसर्‍या स्थानावर फेकल्या
गेल्या.
बांकेपूर हा मतदारसंघ गेल्या 30 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि त्याआधी त्यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते.

Prashant Kishor demolished the BJP’s 30-year-old stronghold.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *