राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सध्या जरी पावसाने राज्यातील काही भागात उसंत घेतली असली तर पावसाच्या विश्रांतीनंतर पाऊस आणि पुराच्या पाण्याने केलेल्या नुकसानाची दाहकता समोर आली आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्र्रातदेखील पावसाचा जोर बघायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी, सततच्या पावसामुळे आणि धरणांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा, कोयना आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सातार्‍यातील संगम माहुली परिसरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला पाण्याने वेढा घातला आहे. तर तिकडे मुंबईच्या पश्चिम उपनगरांतदेखील पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्राला यलो अलर्ट दिला असून, काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वेगाच्या सोसाट्याच्या वार्‍यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, सातार्‍याची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 91.42 टीएमसीवर पोहोचला आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांपर्यंत खाली आणून एकूण 30 हजार 223 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जाणार आहे.

देशभरात 2,700 हून अधिक गुन्हे दाखल
’नीट’ परीक्षेतील पेपरफुटी आणि प्रशासकीय गोंधळाच्या निषेधार्थ देशभरात विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलने करण्यात आली होती. दिल्लीतील जंतर-मंतरसह अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. या आंदोलनांशी संबंधित सुमारे 2,700 हून अधिक एफआयआर दाखल असल्याचा संदर्भही सुनावणीत देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या या स्पष्टीकरणामुळे आता राज्य सरकारांना खर्‍या अर्थाने अन्यायग्रस्त व निष्पाप विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांना दिलासा देण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला.

Heavy rainfall continues across the state.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *