सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळे मळा परिसरात शर्मा मंगल कार्यालयामागे, कौशलेश्वर महादेव मंदिराशेजारी असलेल्या दीपालीनगर भागात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 85 हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली.
याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नहुश साईनाथ जगदाळे (वय 38, व्यवसाय – नोकरी, रा. काळे मळा, दीपालीनगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि एकूण 19.05 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पायातले व रोकड रक्कम असा सुमारे 85 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिरसाठ, व पोहवा व्ही. ई. म्हैसधुणे हे करीत आहेत. दरम्यान, नाशिकमध्ये वाढत्या घरफोडींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाकडून गस्त व सुरक्षा उपायांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे.
एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…
ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…
यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…
पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…
महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…