नाशिक

मखमलाबाद शिवारातील घरफोडीत तीन लाख 80 हजारांचा ऐवज चोरला

पंचवटी : प्रतिनिधी कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी पंचवटीतील मखमलाबाद शिवारात केलेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये तीन लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला. घरातील सोने-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला. कोमल वसंतराव रामटेके (32, रा. इंद्रप्रस्थनगर, विठ्ठल पार्क, ताराई निवास, पेठ रोड, मखमलाबाद शिवार) या पिंपळगाव गरुडेश्वर येथे कामावर असताना अज्ञात चोरट्याने बंद रोहाउसच्या खिडकीचे ग्रील वाकवून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेले लाकडी कपाटातील सोन्याचे टॉप्स, तीन अंगठ्या, चांदीचा दिवा तसेच 50 हजारांची रोकड असा तीन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. जवळील स्काय पार्क सोसायटीमध्ये राहाणारे प्रभाकर पुंडलीक राऊत यांच्या घराचेसुद्धा लॉक तोडून घरातील सामानाची उस्तारपास्तर करून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, उपनिरीक्षक गावित तपास करीत आहेत. दीपक बापूराव पवार (43, रा. अवध रोहाउस, तवली फाटा, पेठरोड, मखमलाबाद शिवार) हे कुटुंबासह कळवण येथे विवाह सोहळ्यास गेलेले असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे टॉप्स, नथ, बाळी असा 74 हजारांचा ऐवज चोरून नेला. हवालदार डी. ए. चव्हाण तपास करीत आहेत.

Property worth Rs 3.80 lakh stolen in house burglary in Shivara, Makhamalabad
 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago