नाशिक

सुळेवाडीच्या उपसरपंचांचा विहिरीत पडून अकस्मात मृत्यू

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी (सुंदरपूर) शिवारात विहिरीतील पाण्यात पडून उपसरपंचांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे नाव अशोक खंडू डावखर (50, रा. सुळेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे आहे. दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6.30 ते 10.30 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब शिवराम डावखर यांच्या शेत गट क्रमांक 765 मधील विहिरीत अशोक डावखर हे पडल्याचे समोर आले. याबाबत मयताचा भाऊ अरुण खंडू डावखर (43) यांनी पोलिसांना खबर दिली. विहिरीतील पाण्यात पडल्याने नाकातोंडात पाणी गेल्यामुळे अशोक डावखर हे बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सिन्नर येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे सुळेवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago