नाशिक

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई :
भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे. हैदराबादमध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि डसॉल्ट एव्हिएशन एकत्रित उत्पादन बनवणार आहेत. 2027-28 पासून प्रतिमहिना दोन फ्युझलाज तयार होण्याची शक्यता आहे. या करारानंतर भारताच्या संरक्षण आणि अवकाश उत्पादन क्षेत्राला मोठी चालना देणार्‍या एका ऐतिहासिक टप्प्याची नोंद झाली आहे.
फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने भारतातील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडसोबत भागीदारी करत राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज भारतात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारत फ्रान्सनंतर राफेल फ्युझलाज उत्पादन करणारा पहिला देश ठरणार आहे. या अंतर्गत, टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारणार असून, त्यामध्ये राफेल विमानाच्या मागील भागाचे लेटरल शेल्स, पूर्ण रिअर सेक्शन, मध्यभागी फ्युझलाज आणि पुढचा भाग तयार केला जाणार आहे. हे केंद्र 2027-28 या आर्थिक वर्षात पहिले फ्युझलाज तयार करेल, अशी अपेक्षा आहे. दर महिन्याला दोन संपूर्ण फ्युझलाज तयार करण्याची क्षमता या केंद्राची असेल.
उत्पादन केंद्र केवळ भारतीय हवाई दलासाठीच नव्हे, तर राफेलच्या आंतरराष्ट्रीय मागणीसुद्धा पूर्ण करेल. सध्या भारताकडे 36 राफेल लढाऊ विमाने आहेत आणि 2030 पर्यंत भारतीय नौदलासाठी 26 राफेल मेरीन जेट्स खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी 63,000 कोटी रुपयांचा करार भारत आणि फ्रान्समध्ये एप्रिल 2025 मध्ये झाला आहे. या करारात तंत्रज्ञान हस्तांतरण आणि देखभाल व उत्पादन केंद्र उभारण्याच्या बाबतीतही तरतुदी आहेत.
फ्रान्स आणि भारताव्यतिरिक्त राफेल लढाऊ विमाने इजिप्त, कतार, युएई, ग्रीस, इंडोनेशिया, क्रोएशिया आणि सर्बिया या देशांमध्ये वापरली जात आहेत किंवा ऑर्डर दिली आहे. या उत्पादन केंद्रासाठी डसॉल्ट एव्हिएशन आणि टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स यांच्यात चार वेगवेगळ्या उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago