पाणीपुरवठ्यावेळी वीज खंडित, अवाजवी बिलांमुळे नागरिक त्रस्त
मालेगाव : प्रतिनिधी
शहरात कार्यरत मालेगाव पॉवर सप्लाय कंपनी या खासगी वीज वितरण कंपनीविरोधात भाजपा शहराध्यक्ष देवा पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
शहरात पाणीपुरवठ्यावेळी वीज खंडित होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. मनपा पाणीपुरवठा विभाग व वीज वितरण कंपनीचे अधिकार्यांचा एकमेकांशी संवाद नसल्याने जनतेला पाणी समस्याला सामोरे जावे लागते. खासगी वीज कंपनी अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच अवाजवी वीजबिल आदी समस्यांचे निवारण होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कंपनीविरोधात हे पहिले आंदोलन असून, आता जर कंपनीने वेळीच सुधारणा केली नाही, तर कंपनी अधिकार्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, अशा इशारा आंदोलकांनी दिला.
यावेळी हरिप्रसाद गुप्ता, कमलेश निकम, लकी गिल, जगदीश गोर्हे, रवीश मारू, देवा पाटील, रजिया शेख, कल्पना पाटील, सुरेखा भुसे आदींची भाषणे झाली. आंदोलनास नंदूतात्या बच्छाव, धनंजय पवार, पोपटराव लोंढे, संदीप भुसे, शरद पानपाटील, डॉ. जयदीप पवार, ज्ञानेश्वर पवार, दत्तू आहिरे, अरुण पाटील, गणेश मोरे, सागर खरे, मनोहर जाधव, दुर्गेश सूर्यवंशी, मिलिंद भालेराव, राजेंद्र गायवाड, सुधीर जाधव, रवींद्र वडनेरे, भाग्येश वैध, सुरेंद्र पहाडे, राजू पाटील, पद्माकर पवार, कल्पना पाटील, अकबर शहा, नाना मराठे, निंबा निकम, बाळासाहेब सावकार, सतीश उपाध्याय, नरेंद्र छाजेड, रवींद्र सूर्यवंशी, भाग्येश कासार, नूर खान, विजय कवाड आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
पाणीपुरवठा वेळेस वीज खंडित करू नये, सर्वसाधारण नागरिकांना सहज तक्रार नोंदवता येईल, अशी संपर्क प्रणाली उपलब्ध करावी, स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, मनपा पाणी व वीजपुरवठा तांत्रिक विभागाने एकमेकांशी संवाद करून संगमताने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी आदी मागण्यांचे निवेदन कंपनी अधिकारी रमेश खरात यांना देण्यात आले.
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…