सकल हिंदू समाजाचा मोर्चा, बंद; दोषींवर कारवाईची मागणी
चांदवड : वार्ताहर
येथील मध्यवर्ती भागात
असलेल्या ऐतिहासिक नागेश्वर महादेव मंदिर परिसरात काही समाजकंटकांनी विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे पुकारलेल्या चांदवड बंदला चांदवडकरांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मंगळवारी शहर कडकडीत बंद राहिले. दोषींवर तातडीने व कठोर कारवाईच्या मागणीसाठी हजारो नागरिकांनी शहरात निषेध मोर्चा काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 26) रात्री 8 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास काही विकृत मानसिकतेच्या समाजकंटकांनी नागेश्वर महादेव मंदिर परिसरात लघुशंका करून मंदिराचे पावित्र्य भंग केले. या नीच कृत्याची माहिती वार्यासारखी पसरताच शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आणि शिवभक्तांनी एकत्र येत या घटनेचा तीव्र निषेध केला. मंगळवारी सकाळी शहरातील सोमवार पेठ या मुख्य मार्गावरून सकल हिंदू समाजातर्फे भव्य निषेध मोर्चा काढला. या मोर्चात हजारोच्या संख्येने पुरुष, युवक आणि महिला (मातृशक्ती) सहभागी झाल्या होत्या. हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. मोर्चा मंदिराजवळ पोहोचल्यानंतर जनसमुदायाने संपूर्ण परिसराची स्वच्छता व शुद्धीकरण केले. त्यानंतर महाआरती केली आणि प्रभू महादेवाला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
‘अशा निंदनीय कृत्यांमुळे समाजातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. प्रशासनाने आरोपींना कायद्याच्या चौकटीत बसवून कठोर शिक्षा द्यावी. हिंदू समाज दैवतांचा अपमान कदापि सहन करणार नाही,‘ अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. तसेच प्रशासनाला या घटनेमागील खर्या सूत्रधारांचा शोध घेण्याची विनंती केली. बंद व मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता. सद्य:स्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे.
Protest against the desecration of Nageshwar temple in Chandwad
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…