नाशिक

राजीवनगर झोपडपट्टीत अवैध कत्तलखान्यावर छापा

चार जण अटकेत; 500 ते 600 किलो गोमांस, तीन दुचाकी, चारचाकी वाहन जप्त

सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई महामार्गालगत असलेल्या राजीवनगर झोपडपट्टी परिसरात अवैधरीत्या गायींची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याची माहिती बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार सुमारे 50 ते 60 कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून सुरू असलेला कत्तलखाना उघडकीस आणला.

या कारवाईदरम्यान विक्रीसाठी ठेवलेले अंदाजे 500 ते 600 किलो गोमांस, तीन दुचाकी, एक चारचाकी वाहन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी कत्तलखाना चालकासह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक संशयित फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी शेकडो गोरक्षकांसह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी दाखल झाले. दरम्यान, महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी घटनास्थळी भेट देऊन कत्तलखान्याची पाहणी केली. त्यानंतर पोलीस आणि प्रशासनाला पंचनामा करून अतिक्रमण असलेला कत्तलखाना पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृतपणे सुरू असलेले दोन्ही कत्तलखाने जमीनदोस्त केले. सकाळी सुरू झालेली ही कारवाई दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू होती.
यावेळी गोरक्षा दलाचे पुरुषोत्तम आव्हाड यांच्यासह कार्यकर्ते, मनपा गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे, नगरसेवक अजिंक्य साने, नगरसेविका सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाठ, माजी नगरसेवक सुनील खोडे आणि विनायक गिते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणी नदीम हारून कुरेशी, मोसिन कुरेशी, रिझवान कुरेशी आणि रिक्षाचालक सलमान शेख यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, अन्य एक संशयित फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
आयुक्त हद्दीत गोमांस विक्रीस पूर्णत: बंदी असतानाही मुंबई महामार्गालगत असलेल्या राजीवनगर परिसरातील झोपडपट्टीत मुख्य रस्त्यावरच अनधिकृत कत्तलखाना उभारून गोवंशाची कत्तल करून त्याची उघडपणे विक्री होत असल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदू संघटनांकडून पुढे आली आहे. याबाबत पोलीस आणि पालिका प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
यापूर्वी गोमांस विक्री वडाळागाव परिसरात होत असल्याच्या तक्रारीनंतर इंदिरानगर पोलिसांनी त्या भागात वेळोवेळी छापे टाकून विक्री केंद्रांवर कारवाई केली होती. त्यानंतरही पोलिसांना चकमा देत राजीवनगर येथे अनधिकृत कत्तलखाना सुरू करून गोमांस विक्री सुरू होती, अशी चर्चा आहे. या ठिकाणाहून शहरासह आसपासच्या लहान-मोठ्या गावांमधून ग्राहक गोमांस घेण्यासाठी येत असल्याची माहितीही पुढे येत आहे.

Raid on illegal slaughterhouse in Rajivnagar slum

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

12 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

12 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago