रणरागिणींचा रॅलीतून जनआक्रोश

धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालविण्याची मागणी

आरोपींचे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
ज्यांंनी कॉर्पोरेट जिहाद केला, त्यांना कडक शासन करा, तसेच नाशिकमधील मुंबई नाका, अंबड, सातपूर व इतर ठिकाणी असलेल्या आयटी कंपन्यांची झाडाझडती घ्या. धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवावा, अशी आक्रमक मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी रणरागिणी जनआक्रोश बाइक रॅलीनंतर झालेल्या भाषणात केली.
सकल हिंदू समाजातर्फे गुरुवारी (दि. 16) नाशिकच्या एका नामांकित आयटी कंपनीत हिंदू तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात व बळजबरीने करण्यात आलेल्या धर्मांतराविरोधात रणरागिणी जनआक्रोश बाइक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत तरुणींनी व विविध हिंदू संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता आमदार प्रा. देवयानी फरांदे, महामंडलेश्वर किन्नर आखाड्याच्या शुभांगी शिंदे, हर्षा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथून बाइक रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली जॉगिंग ट्रॅक, इंदिरानगरमार्गे मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देत कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. आरोपींचे वकीलपत्र वकील बांधवांनी घेऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पीडितांच्या मदतीला 200 महिला वकील
न्यायालयात पीडित तरुणींची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी 200 हिंदू महिला वकील पुढे आल्या आहेत. या 200 महिला वकिलांनी पीडितांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प या बाइक रॅलीदरम्यान केला आहे.

निदा खानला तत्काळ अटक करण्याची मागणी
या प्रकरणात महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ व धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा संशय असलेल्या निदा खानला शोधून तिला तत्काळ अटक करा, अशी मागणी करण्यात आली.

धर्मांतर प्रकरणातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. मतांचे राजकारण करणार्‍या लोकांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ज्या पद्धतीने हिंदूंच्या मुलींना फसवले जात आहे, त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, तसेच त्यांना रोजे ठेवण्यास सांगितले जात आहे, अशा जिहादी लोकांचे राष्ट्रीयतत्व रद्द करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना फाशी दिली पाहिजे.
– आमदार प्रा. देवयानी फरांदे

Public outrage from the rally of the war heroes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *