नागजी सर्कल येथील सिग्नलमध्ये गोंधळ

एकाच वेळी हिरवा, लाल व पिवळा दिवा सुरू

वडाळागाव : प्रतिनिधी
वडाळा रोडवरील नागजी सर्कल येथील सिग्नल यंत्रणेमध्ये गंभीर त्रुटी आढळून येत असून, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. येथे सिग्नलवर एकाच वेळी हिरवा, लाल आणि पिवळा दिवा तसेच सरळ आणि डावीकडे वळण्याचे बाण सुरू असल्याचे दिसून येते. या विसंगतीमुळे वाहनचालकांना योग्य दिशानिर्देश होत नाही. परिणामी वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.
काही वेळा अपघात होण्याची शक्यतादेखील वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे. सिग्नलवर कोणता दिवा पाळायचा हेच कळत नाही. त्यामुळे अचानक ब्रेक लावावे लागतात किंवा गोंधळ होतो, असे एका वाहनचालकाने सांगितले. वाहतूक पोलिस प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सिग्नल यंत्रणा दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. योग्य सिग्नल प्रणाली ही सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी अत्यावश्यक असून, अशा त्रुटींमुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढतो.

Confusion in the signal at Nagji Circle

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *