सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा

गांवकरी

इम्पॅक्ट

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
दैनिक ‘गांवकरी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भगूर-घोटी मार्गावरील पूल बनला धोकादायक’ या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम, इगतपुरी उपविभाग क्रमांक 1 यांनी डागडुजी केली. यासंदर्भातले वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभाग, इगतपुरी तालुक्यातील अधिकार्‍यांनी संबंधित पुलाची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू केली.
भगूर-पांढुर्ली तसेच भगूर-घोटी मार्गावरील पुलांची दुरवस्था, खड्डे, तुटलेला रस्ता आणि पावसामुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती याबाबत दैनिक गावंकरीने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर नागरिक, वाहनचालक आणि लोकप्रतिनिधींकडून ही प्रशासनावर कारवाईसाठी
दबाव वाढला.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या दुरुस्तीचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. पावसाळ्यात नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन धोकादायक भागाची त्वरित दुरुस्ती करण्यात येणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनी दैनिक गांवकरीच्या पाठपुराव्याचे स्वागत करत, लोकहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणार्‍या वृत्तांकनामुळे प्रशासनाला जाग आली असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Public Works Department jolted into action.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *