पीयूसी प्रमाणपत्रही महागले

 

नाशिक : प्रतिनिधी राज्य शासनाने मोटार वाहनांची वायुप्रदूषण तपासणी करून वायुप्रदूषण नियंत्रित प्रमाणपत्र जारी करण्यासाठी सुधारित दर लागू केले आहेत . त्यानुसार जिल्ह्यातील वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांनी वायुप्रदूषण तपासणीकरिता सुधारीत दरपत्रकांचे फलक दर्शनीय ठिकाणी लावावेत , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे .

जिल्ह्यातील प्रत्येक पी.यू.सी. केंद्रावर सुधारित दरपत्रकांचे फलक दर्शनीय ठिकाणी लावणे बंधनकारक असून , पी.यू. सी . केंद्रांकडून याबाबतची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही , याची तपासणी वायुवेग पथकामार्फत करण्यात येणार आहे , असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी कळविले आहे .

असे आहेत सुधारित दर

दुचाकी वाहन – 50 रूपयेपेट्रोलवरील

तीनचाकी वाहन- 100 रूपये

पेट्रोल / सीएनजी / एलपीजीवर चालणारे चारचाकी वाहन -125 रूपये

डिझेलवर चालणारे वाहन – १५० रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *