शाळेसाठी विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

सुरगाणा  प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील आजही अनेक भागात नदीवर पुलंचं नसल्याने नागरिकांना पुरात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
एकीकडे सुरगाणा तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली. पहिल्याच पावसात रस्ते खचले, पूल पाण्याखाली गेली, अनेक गावांचा संपर्क तुटला,  यामुळे अनके भागात आजही पुरपरिस्थिती असून नागरिकांना ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी केटीवेअर प्रवास करावा लागत आहे.सध्या या केटीवरून पुराचे पाणी जात असताना अशा प्रकारचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
सुरगाणा तालुका निसर्ग सौंर्दयाने बहरून गेलेला परिसर. मात्र या निसर्ग सौंदर्यामागे येथील नागरिकांच्या पायाभूत सुविधा कुठेच दिसत नाही. आजही रस्ते, पाणी, आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधांची या ठिकाणी वाणवा आहे. म्हणजे अनेकदा रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका तर नाहीच नाही मात्र रस्ते नसल्याने डोली करून दवाखान्यात न्यावे लागते. पावसाळयात रस्ते नसल्याने पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. तर कधी रस्ते खचल्याने संपर्कच तुटतो. यंदाच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटनेस समोर आल्या. यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुढे आला. एकूणच तालुक्यातील पायाभूत सुविधांची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.
दरम्यान सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा परिसरात नागरिकांसह विद्यार्थ्यांना केटीवरून ये जा करावी लागत आहे. या ठिकाणी कळमणे, भेगू, सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी अशी गावे असून यांचा इतर गावांशी सपंर्क तुटला आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जा ये करण्यासाठी पूल होणे आवश्यक आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधण्यात यावा तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासनाला कधी येणार जाग ?
यंदाच्या पावसाळ्यात सुरगाणा तालुक्यातील अत्यंत भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेक भागात पूर आल्याने संपर्क तुटला, आरोग्य व्यवस्था खोळंबली. पिण्याचे पाण्याची तीन तेरा वाजले. आता शाळा सुरु झाली तर विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी पुलंचं नाही. जीवघेणी कसरत करून पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याची वेळ विद्यार्थ्यांसह नागरिकांवर आली आहे. त्यामुळे संबंधित तालुका, जिल्हा प्रशासन पायाभूत सुविधांसाठी नेमकं काय करतंय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे. शिवाय अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधी मतांचा जोगवा मागण्याशिवाय स्थानिक पातळीवर कामे करतात का? असाही प्रश्न या निमित्ताने होतो आहे.
Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

1 day ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago