नाशिक

रस्ते कामात गुणवत्त्ता हवी

महापौर बांधकाम विभाग व ठेकेदारांना बैठकीत निर्देश

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रस्ते त्वरित वाहतुकीस योग्य स्थितीत आणण्यासाठी दररोज दिवस-रात्र अविरतपणे काम सुरू ठेवावे. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. आवश्यक बांधकाम साहित्याच्या पुरवठ्याबाबत चिंता न करता जास्तीत जास्त क्षमता वापरून आणि उच्च दर्जाची गुणवत्ता राखून कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशीही कामात कोणताही खंड पडू न देता दुरुस्तीची कामे सातत्याने सुरू ठेवावीत, असे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांना दिले
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची परिस्थिती लक्षात घेऊन मंगळ्वारी (दि.4) महापौर दालनात बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदारांची बैठक झाली. यावेळी उपमहापौर विलास अण्णा शिंदे हे उपस्थित होते. त्यांनी बैठकीत शहरातील विविध विभागांतील रस्त्यांची स्थिती, प्रलंबित दुरुस्ती कामे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला. कामाचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा, मनुष्यबळ आणि संसाधने तातडीने वाढविण्याचे निर्देश महापौर आडके यांनी यावेळी दिले.
रस्ते दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्धता, यंत्रसामग्री, वाहतूक आणि मनुष्यबळ वाढवून यांचे समन्वयित नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रस्त्यांची प्रभावी दुरुस्ती करून ते त्वरित वाहतुकीस योग्य (मोटरेबल) करण्यासाठी कडक मुरूम आणि खडी यांचा वापर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन कामांची गुणवत्ता राखावी, असेही त्यांनी नमूद केले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी विशेष डेव्हलपमेंट प्लान तयार करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या विशेष योजनेद्वारे कॉलनी रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण आणि दीर्घकालीन विकासासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. महापौरांनी बांधकाम विभागाला दररोज कामाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून नागरिकांना सुरक्षित व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे सांगितले.

रस्ते दुरुस्तीची कामे उच्च दर्जाची करावी, व कामाला वेग देण्यात यावा आणि सदर कामे गुणवत्तापूर्ण करावी. दर्जाहीन कामे आढळ्ल्यास संबंधितावर कारवाई केली जाइल. नागरिकांना कुठल्याही प्रकारे त्रास होता काम नये, बांधकाम व ठेकेदारांनी याकडे लक्ष देऊन कामे करावीत.
-हिमगौरी आहेर-आडके, महापौर, नाशिक

Quality must be ensured in roadworks

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago