रबने बना दी जोडी!

पाटणा: लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात अस बोललं जात. बिहारमधील एका लग्नाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या लग्नासाठी न बोलवताही हजारो जण आले होते. या लग्नातील पती हा 36 इंच उंचीचा आहे, तर पत्नी ही 34 इंचाची आहे. त्यामुळे या लग्नाची चर्चा सुरु आहे.
वधू आणि वर बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. 24 वर्षीय वधू ममता नवगछिया येथील आहेत. तर वर मसारु येथील मुन्ना भारती (वय 26) आहेत. या लग्नाची चर्चा होण्याचे कारण आहे, या वधू आणि वराची उंची. 36 इंच उंची असलेल्या मुन्ना याला त्याची आयुष्याची साथीदार मिळाली आहे. 34 इंच उंची असलेल्या ममतासोबत मुन्नाचे लग्न झाले आहे. या लग्नाला अनेकांनी उपस्थिती लावत, त्यांच्यासोबत फोटो काढले आहेत.
या लग्नावेळी डीजेवर ’रब ने बना दी जोडी’ हे गाणे वाजत होते आणि लोक त्यावर नाचत होते. या लग्नाला हजारो लोक उपस्थित होते. हे लग्न बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या लग्नाला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावून या वधू वरांसोबत सेल्फी काढून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी या फोटोंना कमेंट केल्या आहेत. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात अशा कमेंट केल्या जात आहेत. एवढी कमी उंची असूनही मुन्नाला त्याच्या आयुष्याची जोडीदार मिळाली आहे. त्याची कमी उंची असूनही त्याचे लग्न झाले आहे. त्याला त्याच्याच उंचीएढी बायको मिळाली आहे. यामुळे अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *