गुरूवार, ५ मे २०२२. वैशाख शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राशिभविष्य –
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा
मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. अनपेक्षित घटना घडतील.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. योग्य सल्ला घेऊन आर्थिक नियोजन करा. मोजके बोला.
मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. वरिष्ठ अधिक जबाबदारी देतील. कामाची दिशा बदलेल.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील.
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मन:शांती मिळेल. प्रवासात अडथळे येतील.
कन्या:- शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. वाहन सुख मिळेल.
तुळ:- प्रवास घडेल. शुभ समाचार समजतील. प्रिय जनांचा सहवास लाभेल.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. वास्तू संबधित कामे मार्गी लागतील.
धनु:- प्रिय व्यक्तींची भेट होईल. मत्सर त्रास जाणवेल. शत्रू पराभूत होतील.
मकर:- प्रगतीचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. राजकीय अंदाज अचूक ठरतील.
कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. नात्यात वाद होऊ शकतात.
मीन:- शेतीची कामे मार्गी लागतील. पशु खरेदी होईल. गैरसमज दूर करा. संयम बाळगा.
. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
हे ही वाचा :राशीभविष्य
|
|