नवी दिल्ली :
भाजप-एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. उपराष्ट्रपतिपदासाठी काल
झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन विजयी झाल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल आता देशाचे उपराष्ट्रपती झाले
आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपकडून कोणाला संधी मिळणार, अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने नेहमीप्रमाणे नावाचे धक्कातंत्र दिले. सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे, महाविकास आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. अखेर काल झालेल्या मतदानानंतर सी. पी. राधाकृष्णन यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे खासदार फुटल्याचे निकालानंतर समोर आलं आहे. राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतदान मिळाले आहे. सी.पी. राधाकृष्णन यांना 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे 752 वैध मतांपैकी 452 पहिल्या पसंतीच्या मतांनी त्यांचा विजय झाला आहे. बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं पडली आहेत. या निवडणुकीत 15 मते बाद झाली. दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवड मंडळात 782 सदस्य असतात, त्यांपैकी 543 लोकसभेचे आणि 239 राज्यसभेचे असतात.
सी. पी. राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माजी राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू असताना राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रातून ते आता थेट दिल्लीच्या उपराष्ट्रपतिपदी विराजमान झाले आहेत.
सी. पी. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी त्यांचे वय 17.5 वर्षे होते. सी. पी. राधाकृष्णन हे देखील दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.

मोदींकडून अभिनंदन, भाजपचा काँग्रेसला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या विजयानंतर सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी आपलं आयुष्य सर्वसामान्य, गरिबांसाठी व समाजासाठी खर्ची केल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. भाजप खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसला टोला लगावला. राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावे, असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरचा दाखला दिला. खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर नाही. बॅलेट पेपरवर झालेली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावे, असेही गोपछडे यांनी म्हटले.

उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत निर्णय

उपराष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बदल करण्यात आला आहे. गृह मंत्रालयाकडून विविध सुरक्षा यंत्रणांशी संयुक्त सुरक्षा आढावा बैठक घेण्यात आली. यात चर्चा केल्यानंतर उपराष्ट्रपतींची सुरक्षा सीआरपीएफकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली पोलिसांकडे नाही, तर उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे असणार आहे.

सी. पी. राधाकृष्णन यांना खेळाचीही आवड
सी. पी. राधाकृष्णन यांना खेळाची खूप आवड आहे. त्यांना टेबल टेनिस, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या खेळांची आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात त्यांचं टेबल टेनिस आणि धावण्यात विशेष प्राविण्य होतं. 1978 मध्ये त्यांनी मदुराई विद्यापीठामधून बीबीएचं शिक्षण घेतलं होतं.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago