नाशिक

राहुडला घराला आग; तीन लाखांचे नुकसान

नामपूर : वार्ताहर
राहुड (ता. बागलाण) येथील शेतकरी रामराव मोतीराम खैरनार यांचा संपूर्ण परिवार लग्नकार्यासाठी सुरत येथे गेला होता, तर अनिल खैरनार काळगाव येथे शेतीच्या कामासाठी गेला होता. घरात कोणीच नसताना घराला आग लागल्यानंतर शेजारील नागरिक भीमराव ठाकरे, सचिन ठाकरे यांनी धूर निघताना पाहिला. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आगीत संसारोपयोगी साहित्य, घरातील कागदपत्रे, ट्रॅक्टरचे आरसी बुक, गहू, बाजरीचे पोते, पोल्ट्रीसाठी आणलेले पत्रे, मोटारी जलपरी, पिस्टन, सोने-चांदी व सहा शेळ्याही जळून खाक झाल्या.
टेंबे येथील भाऊसाहेब अहिरे, सरपंच डॉ. शेषराव पाटील, बाजार समिती संचालक सयाजी देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले. भाऊसाहेब अहिरे यांनी आर्थिक मदत केली.तलाठी विष्णू गायकवाड यांनी तीन लाखांचा पंचनामा केला आहे.

Rahul’s house catches fire; loss of Rs 3 lakhs

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago