अवैध गॅस जोडणीचा संशय
सिडको : विशेष प्रतिनिधी
शालिमार परिसरातील जिल्हा संदर्भ रुग्णालयानजीक शुक्रवारी सकाळच्या सुमारास उभी असलेली इको कार अचानक पेट घेऊन जळून खाक झाल्याची घटना घडली. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना कार्यालयासमोरील रस्त्यावर उभी असलेली इको कार अचानक धुरळा करत पेटली. काही क्षणांतच मोठा आवाज झाल्याचेही नागरिकांनी सांगितले. हा आवाज गॅस सिलिंडर अथवा गॅस किटमधील स्फोटामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला
जात आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वाहनात अवैधरीत्या गॅस किट बसवण्यात आल्याचा संशय आहे. नियमबाह्य पद्धतीने बसवलेल्या गॅस सिलिंडर किंवा किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत परवानगी नसलेली किंवा निकृष्ट दर्जाची गॅस यंत्रणा वाहनांमध्ये बसवल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निामन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणी आगीचे नेमके कारण काय, वाहनात अवैध गॅस किट होते का, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. अधिकृत अहवालानंतरच घटनेचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला सप्तशृंगगड : प्रतिनिधी दसर्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल…
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पवित्र गोदाघाटावर रविवारी (दि. 25) 517 वादकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद…
50 लाखांच्या परताव्याचे दिले होते आमिष सिडको : प्रतिनिधी इन्स्टाग्रामवरील रील्सद्वारे कंपनीची माहिती देत 15…
अॅग्रिगेटर धोरणाची मंजुरी नसल्याचा परिवहन विभागाचा दावा पंचवटी : प्रतिनिधी नाशिक शहरात रॅपिडो, ओला आणि…
सिडको : प्रतिनिधी नाशिकच्या सिडको परिसरातील पवननगर येथील पोलीस चौकी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून…
नवरदेवाला पेटवून देण्याचा प्रयत्न येवला : प्रतिनिधी प्रेमविवाहाच्या रागातून येवल्यात भर लग्नमंडपात जोरदार राडा झाला.…