नाशिक

सिन्नरमध्ये बनावट देशी दारूकारखान्यावर धाड

14.37 लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 लाखांची रोकड हस्तगत

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर पोलिसांनी शहरातील द्वारकानगर परिसरात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायने, कच्चा माल, रिकाम्या बाटल्या, बनावट लेबले तसेच 11 लाख रुपयांची रोकड असा एकूण 14 लाख 37 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राहुल उर्फ सागर बबन आव्हाड (वय 33, रा. साई आनंद अपार्टमेंट, द्वारकानगर, उद्योग भवन, सिन्नर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासह दिनेश गायकवाड (रा. धुळे) हा साथीदार फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
सिन्नर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पेट्रोलिंग व गुप्त माहिती संकलन सुरू असताना पोलीस हवालदार निवृत्ती गिते यांना द्वारकानगर येथील साई प्राइड अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील एका फ्लॅटमध्ये बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने छापा टाकला. तपासणीदरम्यान फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य, रसायने, रिकाम्या बाटल्या आणि बनावट लेबले आढळून आली. तसेच रोख 11 लाख रुपयांसह एकूण 14.37 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 438/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 123, 318(4), अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार गिते, बोराडे, गवंडी, बिडगर, टिळे, कोकाटे, काकड व साळवे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र मराठे यांचे पथकही या कारवाईत सहभागी झाले होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण
करीत आहेत.

Raid on fake country liquor factory in Sinnar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago