नाशिक

जिल्ह्यात आर्द्राच्या पहिल्याच दिवशी पावसाची हजेरी

पिंपळगावला वीज कोसळून गाय-वासरू ठार

नाशिक : प्रतिनिधी
आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी चांदवड, निफाड, येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. या पावसामुळे उकाडा काहीसा कमी झाला. दरम्यान, पिंपळगाव नजीक (ता. निफाड) शिवारात वीज कोसळून गाय-वासरू जागीच ठार झाले.
चांदवड शहरात शिवाजी चौक परिसरात मुख्य रस्त्यांवर पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांनी अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले होते कॉलेज रोडवरील रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात पावसाचे पाणी थेट काही दुकानांमध्ये शिरल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले. येवला शहरात पावसामुळे गंगा दरवाजा परिसरातील भुयारी गटारीची दुरवस्था समोर आली. पावसाचे पाणी तुंबल्यामुळे गटारीचे घाण पाणी थेट रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.
सिन्नर तालुक्यातील वडांगळीसह परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्र्यंबकेश्वर शहरात सलग चार तास सुरू असलेल्या पावसामुळे विकासकामांमुळे सर्वत्र चिखल राडा झाला. सोमवार असल्याने भाविकांची गर्दी अधिक होती, पावसात उभे राहून घोंगट्याचा आधार घेत भाविकांनी दर्शन घेतले. इगतपुरी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने भात पिकाला नवसंजीवनी मिळणार असून, शेती कामांना वेग येणार आहे. निफाड तालुक्यातील वाकद, शिरवाडे, देवगाव, कोळगाव, कानळद, रुई, धानोरे, विंचूर, डोंगरगाव, नांदगाव, धारणगाव, खेडले झुंगे, सारोळेथडी, नांदूरमधमेश्वर, दिंडोरी तास, तारुखेडले, तामसवाडी, करंजी खुर्द, ब्राह्मणवाडे, खानगाव थडी आणि म्हाळसाकोरे परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा कायम आहे.

Rain makes an appearance in the district on the very first day of the ‘Ardra’ Nakshatra.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago